देवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने कुष्टधाम येथे अन्नधान्य वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा
उस्मानाबाद :- देवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त उस्मानाबाद शहरा जवळील कुष्टधाम येथे अन्नधान्य वाटप करण्यात आले तर त्या परिसरात राहणाऱ्या गरीब गरजू लोकांना इतर खाण्याचे साहित्य व लहान मुलांना केळी , बिस्कीट सागर भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले.
आयुर्वेदिक कॉलेज समोरील राजमाता अहिल्याबाई होळकर चौक येथे स्वच्छता मोहीम राबवून चौकातील देवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने स्वच्छता करण्यात आली आहे.
यावेळीदेवा फाउंडेशन जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ माने , अतुल इंगळे, प्रसाद असलेकर , शुभम डोंगे, आकाश घोडके, अण्णा शेलार, सुधीर माने, शुभम शेंडगे ,विशाल पवार ,शुभम मुद्दे ,कयफ , संदिप आंदळे , अनिकेत असलेकर ,धीरज मेंढे, मासाळ खंडू , रोहित भीद्रे, निसार शेख ,किरण घुले , संकेत हाजगुडे व मोठ्या संख्येने देवा ग्रुप फाउंडेशन सदस्य तरुण उपस्थित होते.