उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
उस्मानाबाद आज दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रिडा संकुल प्रांगणात उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या खालील पोलीस अधिकारी- अंमलदारांचा मा. पालक मंत्री- श्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते संबंधीत प्रशस्ती पत्र- पदक देउन गौरव करण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांना गृह मंत्रालय, भारत सरकारचे सन- 2019 चे उत्कृष्ट अन्वेषनाचे ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहिर झाले होते. त्याचे प्रशस्ती पत्र-पदक या कार्यक्रमात मा. मंत्रीमहोदयांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
पोलीस खात्यातील सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांना प्रतिवर्षी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातर्फे मा. पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह जाहिर केले जाते. सन- 2019 चे बोधचिन्ह उस्मानाबाद पोलीस दलातील 1) पोउपनि- श्री कैलास लहाणे 2) सपोउपनि- श्री श्रीनिवास घुगे 3) पोहेकॉ- श्री प्रदिप जाधव 4) पोहेकॉ- श्री सुनिल काळेकर 5)पोहेकॉ- आत्माराम जाधव 6)पोहेकॉ- सुकूमार बनसोडे 7)पोना- रामेश्वर उंबरे यांना जाहिर झाले होते. ते प्रशस्ती पत्र-पदक या कार्यक्रमात मा. मंत्रीमहोदयांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
त्यांच्यासह कोविड- 19 च्या लॉकडाऊन काळात उल्लेखनिय कामगीरी करणारे कोरोना योध्दे 1)पोनि- श्री सतिष चव्हाण 2)रापोनि- श्री शांताराम वाघमोडे 3)सपोनि- श्री संदिप मोदे 4)पोहेकॉ- श्री विष्णु केंडे 5)पोहेकॉ- श्री सुरेश चौधरी यांनाही मा. मंत्रीमहोदयांच्या हस्ते प्रशस्ती पत्रे प्रदान करण्यात आली.