9 वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी ताब्यात

0


9 वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी ताब्यात

पोलीस ठाणे, आंबी: आंबी पोलीस ठाणे गु.र.क्र. 21 / 2011 या भा.दं.सं. कलम- 353, 333, 337, 427, 504, 147, 148, 149 या लोकसेवकास मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी- सिध्दु वसंत थोरात, वय 41 वर्षे, रा. अंत्रोळी, ता. सोलापूर (द.) हा गेली 9 वर्षापासून पोलीसांना तपासकामी हवा होता. पोलीस त्याच्या मागावर असल्याने तो गावी परतत नसल्याने गोपनीय खबरेच्या आधारे पोलीस पथकाने त्यास 22 जानेवारी रोजी सोलापूर शहर परिसरातून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबी पो.ठा. चे सपोनि- श्री आशिष खांडेकर, पोउपनि- श्री वाघुले, पोना- सम्राट माने, पोकॉ- गायकवाड यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top