अवैध वाळू साठा व ट्रकवर उस्मानाबाद तहसीलकडून कारवाई
उस्मानाबाद,दि.23( प्रतिनिधी ):- गुजरात मधील तापी येथून अवैधरित्या वाळू आणून शहरातील सांजा रोड येथे विना परवानगी साठा करून ठेवल्याबद्यल संबंधिता विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.वाळु आणि ट्रक ताब्यात घेतला आहे. ही सर्व कारवाई उस्मानाबाद तहसील कार्यालयाने केली आहे.
उस्मानाबाद शहरालगत असणा-या सांजा रोड येथे आज तापी (गुजरात) येथून आलेल्या तीन ट्रक वाहना (क्रंमाक MH 21AU1481,MH 12 FZ 9407 MH 04 HD 1429) मध्ये वाळू असल्याचे निदर्शनास आले.संबंधित ट्रक चालकास शासकीय पावतीबाबत विचारणा केली असता संबंधिताने पावती सादर केली परंतु त्यावर खरेदीदाराचे नाव किंवा ग्राहकांचे नाव दिसून आले नाही. तसेच सांजा रोडलगत सार्वजनिक ठिकाणी कोणताही शासकीय परवाना नसताना तेथे अंदाजे 40 ब्रास वाळू साठा व ट्रक मध्ये अंदाजे 15 ब्रास असे एकूण 55 ब्रास त्यांची अंदाजे बाजारभाव प्रमाणे किंमत पंधरा लाख आहे.
तेथील वाळू व इतर गौण खनिज साठयाचा पंचनामा करुन तहसील कार्यालयाच्या परिसरात घेऊन जाण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दोन ट्रक शहर पोलीस स्टेशन आणि एक ट्रक आनंदनगर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्याची कारवाई सुरू आहे.उस्मानाबाद तहसील कार्यालयात सध्या अवैध गौणखनिज पथक गठीत करुन कारवाई करण्यात येत आहे. आज येथील तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्री. देशपांडे, श्री. चिरखे, श्री. काळे व तलाठी श्री समाधान जावळे,श्री. अमोल निरफळ, श्री. रोडगे, श्री. बालाजी लाकाळ,श्री गुजर श्री कानाडे ,श्री आखाडे वाहन चालक श्री जमादार यांच्या पथकानी ही कारवाई केली.
****