google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी अपघात गुन्हे दाखल !

Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी अपघात गुन्हे दाखल !

0



 Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी अपघात गुन्हे दाखल ! 

पोलीस ठाणे, तामलवाडी: सुरतगांव, ता. तुळजापूर येथील दिपा व कुंडलीक सदा गुंड हे दोघे पती- पत्नी 23 जानेवारी रोजी 18.00 वा. सु. सुरतगांव- सांगवी (काटी) असे पायी चालत जात होते. दरम्यान सांगवी (काटी) शिवारातील रस्त्यावर अज्ञात वाहन चालकाने ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून नमूद पती- पन्तींना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात 40 वर्षीय दिपा गुंड या गंभीर जखमी होउन मयत झाल्या तर कुंडलीक गुंड हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या कुंडलीक गुंड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, मुरुम: चालक- महादेव दुधाराम राठोड, रा. पाटील तांडा, मुरुम याने 19 जानेवारी रोजी 01.30 वा.सु. नोंदनी क्रमांक नसलेला महिंद्रा ट्रॅक्टर मुरुम येथील आलूर रस्त्यावर निष्काळजीपणे चालवल्याने ट्रॅक्टर नियंत्रण सुटून ईकळगे यांच्या हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात हॉटेल मधील विठ्ठल मारुती खडके, वय 77 वर्षे, रा. आलुर हे मयत झाले तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- विलास खडके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रॅक्टर चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338, 427 आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वरील माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top