ढोकी येथे मारहाण गुन्हा दाखल - Filed assault case at Dhoki

0



ढोकी येथे मारहाण गुन्हा दाखल

 ढोकी: उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाणे हद्दीतील बालाजी नवसाजी पवार हे 22 जानेवारी रोजी 11.00 वा. येवती येथील आपल्या शेतात काम करत होते. यावेळी गावकरी- शिवाजी कोंडीबा ढेकळे यांसह त्याचा मुलगा- रवीकुमार व राहुल सुन- बबीता हिने शेत खरेदी व्यवहाराच्या कारणावरुन बालाजी पवार यांसह त्यांचे वडील व पत्नी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बालाजी पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत ढोकी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top