पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करण्यासाठी जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
उस्मानाबाद दि.२३ (प्रतिनिधी) - पेट्रोल व डिझेलच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण होत असयामुळे त्याचा मानवी जीवनावर देखील विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरात वेगवेगळे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जिल्हा विक्री अधिकारी निशांत यादव व भारत पेट्रोलियमचे जिल्हा विक्री अधिकारी आलम परवेज यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दि.२३ जानेवारी रोजी दिली.
येथील पुष्पक पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रवींद्र शेरखाने, पांडुरंग गरड, गिरीष हंबीरे, डॉ. मिलिंद पवळ, अमित शेरखाने व मोरे उपस्थित होते. पुढे बोलताना निशांत यादव व आलम परवेज म्हणाले की, भारत सरकारने ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास व पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला असून जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्च करण्याबरोबरच परकीय तिजोरीवरील वाढते वजन कमी करण्यासाठी जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरित वायू च्या प्रति कोण परिणामापासून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे अंतिम उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे. त्यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय यांच्या माध्यमातून ते उद्योगातील राज्यातील समन्वयक यांच्या या माध्यमातून संपूर्ण देशभरात जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जात आहेत व येणार आहेत असे त्यांनी नमूद केले. तसेच हरित व स्वच्छ ऊर्जा या घोषवाक्या प्रमाणे दि.१६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सक्षम म्हणजेच संरक्षण महत्त्व महोत्सव २०२१ आयोजित करण्यात आलेला असून राज्यातील शाळा व महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच इथेनॉलचा दहा टक्के इंधनामध्ये वापर करण्यात येत असून पेट्रोल पंप चालकांना देखील ते बंद कार्य करण्यात आले आहे. पेट्रोल व डिझेल आदींचे भारतामध्ये २० टक्के उत्पादन होत असून ८० टक्के कच्चे डिझेल व पेट्रोल आयात केले जात आहे. जिल्ह्यामध्ये १३२ पेट्रोल पंपाच्या माध्यमातून दर महिन्याला पन्नास हजार किलो लिटर डिझेल व पेट्रोलची विक्री होत असून सर्व प्रकारच्या सुविधा ग्राहकांना पेट्रोल पंपावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर आगामी सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर सीएनजीची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
* दूषित झालेल्या व होत असलेल्या पर्यावरणामुळे मानवी जीवन संकटात सापडत चालले आहे. त्यामुळे भविष्यातील उद्भवणाऱ्या संकटापासून बचाव करणे आवश्यक आहे. तर पुढच्या पिढीला आपण चांगल्या प्रकारचे व सुरक्षित नैसर्गिक वातावरण उपलब्ध कसे ठेवता येईल हा संदेश देण्यासाठी सर्वांनीच डिझेल व पेट्रोलच्या अतिरिक्त होणाऱ्या वापरावर नियंत्रण आणणे काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी नमूद केले.
छाया राहुल कोरे आळणीकर