बळीराजा रक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने माध्यमीक विद्यालय येवती येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0

बळीराजा रक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने माध्यमीक विद्यालय येवती येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

( बातमी लेखन प्रकाश साखरे )

तुळजापूर :- तालुक्यात बळीराजा रक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमीक विद्यालय येवती येथील 2019-20 साली दहावी  मध्ये उच्च गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, रोख रक्क्म तसेंच प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी  संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. पाटील सर म्हणाले की आपल्या गावामधील विद्यार्थी हे स्वतः अभ्यास करून कुठल्याही प्रकारचे क्लास  न करता खूप चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर हे होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top