उस्मानाबाद : खाँजा नगर, उस्मानाबाद येथे हजरद खाँजा शमशोद्दीन (रहे) गाजी पार्क चे उद्घाटन काल दिनांक २६ जानेवारी रोजी खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी बोलताना, प्रत्येक ठिकाणी जे करील ते राव करी अशी भावना असते. परंतु नगसेवक बाबा मुजावर यांनी आपल्या या भागात याच्या विरुद्ध केले. स्वतः व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ठ रितीने गाजी पार्क उभारण्यात आले.अशाच प्रकारे हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अन्य नगरसेवक यांनी हि ठेवावा व शहरातील बाग बगीचा ची दुरुस्ती करावी व वृक्षा रोपण करावे व हिरवळ वाढवावी. असे मत ओम राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.
तसेच कोरोना काळात मोह्हला क्लीनिक च्या माध्यमातुन डॉ.शकील खान, डॉ.मिनाहज शेख, डॉ.सय्यद रजवी यांनी उत्कृष्ठ काम केले त्याबद्दल त्यांचे ओमराजे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, नादेर उल्ला हुसेनी, खलील सर, मैनुदिन पठाण, मसूद शेख, प्रशांत पाटील, पत्रकार महेश पोतदार, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राठोड, नायब तहसीलदार खोंदे साहेब, आशिष मोदानी, नगसेवक तथा गटनेते सोमनाथ गुरव, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगसेवक अक्षय ढोबळे, गणेश खोचरे, राहुल बागल, गफार काझी, कलीम कुरेशी, मुजीब भाई, साबेर भाई, अलीम आण्णा, आदी मान्यवर सह ग्रामस्थ उपस्थित होते.