मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त उस्मानाबाद शहरातील बाजारपेठ फुलली, अनेक नागरिक खरेदी साठी गर्दी करताना दिसत आहेत!
उस्मानाबाद : दि 13 - पौष महिन्यात दरवर्षी मकरसंक्रांती चे सण साजरा केला जात असून येणाऱ्या सणासाठी बांगड्या, गाडगी,तसेच हळद कुंकू , पाच फळे , फुलाचे गजरे , इत्यादी सामानाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दरवर्षी प्रमाणे उद्या दिनांक 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचे सण आहे. या सणानिमित्त उस्मानाबाद शहरातील बाजार पेठेत नागरिकांची खरेदी साठी गर्दी होताना पहावयास मिळत आहे.
जागोजागी बांगड्या , हळद-कुंकू तसेच इतर समान विक्री साठी छोट्या व्यापाऱ्यांकडून लावण्यात आलेल्या स्टॉल मुळे बाजारपेठ फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.