मतदान व मतमोजणी कक्षात भ्रमणध्वनीला मनाई-मा.पोलीस अधीक्षकांचे आवाहन.”
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि.15/01/2021 रोजी मतदान होत असून दि.18/01/2021 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान हा गोपनीय अधीकार असल्याने मतदान कक्षात व मतमोजणी कक्षात मतदार-उमेदवार प्रतिनिधी यांनी भ्रमणध्वनी-कॅमेरा नेण्यास मनाई आहे. काही उपद्रवी नागरीक लपवून छपवून मतदान कक्षात-मतमोजणी कक्षात भ्रमणध्वनी /कॅमेरा घेवून जावून चित्रीकरण करतात आणि मतदान प्रक्रीया संबंधी छायाचित्रे – व्हिडीओ सामाजीक माध्यमांत प्रसारीत करतात. यावरून त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल होण्याच्या घटना उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकी वेळी घडल्या आहेत.
तरी मतदान कक्षात व मतमोजणी कक्षात मतदार-उमेदवार प्रतिनिधी यांनी भ्रमणध्वनी-कॅमेरा, शस्त्रे, ज्वालाग्रही वस्तू, आगपेटी इत्यादी साहीत्य्ा नेवू नये अन्यथा त्यांच्या विरूद्ध प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी जनतेस केले आहे.