उमरगा शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शटरचे कुलुप तोडुन चोरी !
उमरगा: - उमरगा शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शटरचे कुलुप अज्ञात चोरट्याने दि.08 ते 11/01/2021 या काळात तोडून आतील तिजोरी गॅस वेल्डींगने कापून उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अशा मजकुराच्या शाखाधिकारी विठ्ठल औरादे यांनी दि.12/01/2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भा.दं.सं. कलम 457,511 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस माहिती विभागाकडून देण्यात आली आहे