उस्मानाबाद जिल्ह्यातील अवैध मद्य विरोधी 5 कारवाया
* पोलीस ठाणे, परंडा: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन परंडा पो.ठा. च्या पथकाने काल दि. 12.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत भिम नगर येथे छापा टाकला यावेळी गणेश बनसोडे हे राहत्या घरासमोर 10 लीटर गावठी दारू विक्री व्यवसायास बाळगलेले आढळले.
* पोलीस ठाणे, उमरगा: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने काल दि. 12.01.2021 रोजी बलसुर तांडा येथे छापा टाकला यावेळी मुकेश चव्हाण हे राहत्या घरासमोर देशी दारूच्या 17 बाटल्या विनापरवाना बाळगलेले आढळले.
* पोलीस ठाणे, कळंब: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पथकाने काल दि. 12.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत ईटकुर येथे छापा टाकला यावेळी जयश्री शिंदे या राहत्या घरासमोर 18 लीटर गावठी दारू विक्री व्यवसायास बाळगलेल्या आढळल्या.
* पोलीस ठाणे, मुरूम: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन मुरूम पो.ठा. च्या पथकाने काल दि. 12.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकले.
* पहिल्या घटनेत महादेव सुरवसे रा.चिंचोली हे घरासमोर 10 लि. अवैध गावठी दारु बाळगले असतांना आढळले.
* दुसऱ्या घटनेत गजानन लवटे रा.दाळिंब हे घरासमोर 05 लि. अवैध गावठी दारु बाळगले असतांना आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.