उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीने प्रजास्ताक दिनांची तयारी करा - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद,दि.07(प्रतिनिधी ):कोरो
प्रजास्ताक दिनाच्या पूर्व तयारीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तेव्हा ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रूपाली डंबे-आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के.पाटील,जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.एस.डी. तुबाकले, राज्य परिवहन कार्यालयाचे शेखर आचार्य, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी एम.के.वानखेडे, जि.प.च्या उपशिक्षणधिकारी (माध्यमिक)- रत्नमाला गायकवाड, उपशिक्षणधिकारी (प्राथमिक) यू.ए.सांगळे, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खामारे आदी उपस्थित होते.
प्रजास्ताक दिनाचा हा सोहळा शहरातील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे. सकळी 9 वाजून 15 मिनिटांनी पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाईल.तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल,तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रागणात सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल.
दरवर्षी प्रमाणे विविध विभागांना ठरवून दिलेली कामे वेळेत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. प्रामुख्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, पोलीसांचे संचलन घेऊ नये. त्यातही शाळांना सुटटी असल्याने प्रभात फेऱ्या काढता येणार नाहीत व आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन उपाय योजना कराव्यात नागरिकांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घ्यावी, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी यावेळी केले.