Osmanaabd जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी 7 ठिकाणी कारवाया गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, बेंबळी: राजकुमार सोमवंशी, रा. आरणी, ता. लोहारा हे देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 468 ₹) तुळजापूर- लातुर रस्त्यालगततच्या सार्थक हॉटेल बाजूस अवैधपणे बाळगले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास 30 जानेवारी रोजी आढळले.
पोलीस ठाणे, मुरुम: अवैध मद्य विक्रीच्या खबरेवरुन मुरुम पो.ठा. च्या पथकाने 30 जानेवारी रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे मारले.
पहिल्या घटनेत रत्नाजी पावणे, रा. दाळींब, ता. उमरगा हे 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 750 ₹) गावशिवारात बाळगले असतांना आढळले.
दुसऱ्या घटनेत महाळाप्पा गाडेकर, रा. येणेगुर, ता. उमरगा हे 18 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 900 ₹) गावातील मरीआई चौकाजवळ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, ढोकी: अवैध मद्य विक्रीच्या खबरेवरुन ढोकी पो.ठा. च्या पथकाने 30 जानेवारी रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या तीन ठिकाणी छापे मारले.
पहिल्या घटनेत 1)युवराज शिंदे, रा. चव्हाण पारधी पिढी, ढोकी 2)तोळाबाई चव्हाण, रा. राजेशनगर ढोकी हे दोघे आपापल्या राहत्या घरासमोर एकुण 25 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,600 ₹) बाळगले असतांना पथकास आढळले.
दुसऱ्या घटनेत मोहन पवार, रा. पारधी पिढी, तेर हे 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 410 ₹) आपल्या राहत्या घरासमोर बाळगले असतांना पथकास आढळले.
पोलीस ठाणे, वाशी: सारीका पवार, रा. वाशी या 30 जानेवारी रोजी गावातील मुरकुटे पेट्रोलियम पंपासमोरील मोकळ्या जागेत गावठी दारु निर्मीचा 200 लि. द्रवपदार्थ व 30 लि. गावठी दारु (किं.अं. 12,400 ₹) बाळगल्या असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
यावरुन पोलीसांनी गावठी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला तर मद्याच्या बाटल्या व गावठी दारु जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 7 गुन्हे नोंदवले आहेत.