कळंब पोलीस ठाण्यात धुडगूस घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
Osmanabad : जिल्ह्यातील कळम पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक- शेषाबाई मोटे या 30 जानेवारी रोजी 15.30 वा. कळंब पोलीस ठाणे अंमलदार म्हणुन कर्तव्यावर होत्या. यावेळी मांडवा, ता. वाशी येथील विशाल अनिल काळे याने तेथे येउन, “माझी मोटारसायकल व पिस्तुल गुसिंगे साहेबांकडे जमा आहे ते मला आत्ताच्या आत्ता दे.” अशी हुज्जत शेषाबाई मोटे यांच्याशी घातली. यावर मोटे यांनी गुसिंगे हे सुटीवर असल्याचे विशाल काळे यास सांगीतले. यानंतरही विशाल काळे याने मोटे यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच पोलीस ठाण्यात कामानिमीत्त आलेल्या व्यक्तींनाही शिवीगाळ करुन त्यांच्यासह पोलीसांच्या दिशेने दगड फेकून मारले आणि पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहने व विद्युत जनित्रावर दगड मारुन आर्थिक नुकसान केले. पोलीसांनी त्याचा विरोध केला असता, “मी पारधी जातीचा आहे तुम्हा सर्वांवर ॲट्रासीटीचा गुन्हा दाखल करतो.” अशी धमकी दिली. अशा प्रकारे विशाल काळे याने पोलीसांच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन शेषाबाई मोटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन विशाल काळे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 336, 294, 504, 506, 427 अंतर्गत कळंब पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे.