Osmanabad जिल्ह्यात 60 हजार 430 रुपयांची फसवणूक गुन्हा दाखल !
Osmanabad : जिल्ह्यातील मुरुम, ता. उमरगा येथील महादेव चनाप्पा घाळे, वय 55 वर्षे हे 27 जानेवारी रोजी 11.30 वा. सु. मुरुम येथील एटीएम मशीन मधून पैसे काढत असतांना पाठीमागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने मदत करण्याच्या बहाण्याने घाळे यांचे डेबीट कार्ड आपल्या हाती घेउन त्यांना पैसे काढण्यास मदत केली. यावेळी घाळे यांनी टाकलेला पासवर्ड त्याने बघीतला आणि त्याच रंग संगतीचे दुसरे डेबीट कार्ड घाळे यांना परत केले. घाळे यांनी त्या डेबीट कार्डवरील आपले नाव, माहिती न तपासता ते डेबीट कार्ड निष्काळजीपणे ठेउन घेतले. यानंतर त्या भामट्याने सायंकाळी 40,000 ₹ व दुसऱ्या दिवशी 28 जानेवारी रोजी 20,430 ₹ रक्कम वेगवेगळ्या एटीएम मधून घाळे यांच्या बँक खात्यातील रक्कम काढली. रक्कम काढल्याबद्दल बँकेने पाठवलेले लघु संदेश घाळे यांनी उशीराने बघीतले असता त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. अशा मजकुराच्या महादेव घाळे यांनी 30 जानेवारी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत मुुरूूूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.