Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हा दाखल

0

Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे, वाशी: सतीश त्रिंबक घुले, रा. नांदगाव, ता. वाशी यांनी त्यांची एम.एच. 25 एएन 6438 ही हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल 29 जानेवारी रोजी 22.00 वा. सु. राहत्या घरासमारे लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.  अशा मजकुराच्या सतीश घुले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तामलवाडी: सुरतगाव, ता. तुळजापूर येथील कुमार हरीबा गुंड यांनी त्यांची एम.एच. 13 बीटी 9096 ही होंडा शाईन मोटारसायकल 27 जानेवारी रोजी 22.00 वा. गंजेवाडी शिवारातील शेत गोठ्याजवळ लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ती मो.सा. लावल्या जागी न आढळल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे.  अशा मजकुराच्या कुमार गुंड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top