उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, कळंब: मोहा, ता. कळंब येथील किशोर बाळासाहेब मडके कुटूंबीयांत व बिभिषन जगन्नाथ मडके कुटूंबीयांत 30 जानेवारी रोजी 10.30 ते 11.30 वा. चे दरम्यान राहत्या गल्लीत शेती वहिवाटीच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही कुटूंबांतील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी गटांतीत स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन दोन्ही गटांतील सदस्यांनी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस ठाणे, मुरुम: महालिंगरायवाडी, ता. उमरगा येथील भास्कर बापु जाधव हे 17 जानेवारी रोजी 17.30 वा. सु. गावातील शेतशिवारातील पानंद रस्त्याने पायी जात होते. यावेळी गावातील नातेवाईक- प्रशांत धनराज जाधव, प्रविण धनराज जाधव या दोघां भावांनी रहदारीच्या कारणावरुन भास्कर जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या भास्कर जाधव यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, येरमाळा: रत्नापुर, ता. कळंब येथील अभिजीत, सजित, ज्योती युवराज जाधवर यांनी कौटुंबीक कारणावरुन 28 जानेवारी रोजी 20.00 राहत्या गल्लीत नातेवाईक-विमल युवराज जाधवर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. मुलीस होत असलेली मारहाण सोडवण्यास आलेल्या फुलाबाई भांगे यांनाही नमूद तीघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या विमल जाधवर यांनी 30 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.