दलित फिर्यादीच्या परस्पर कोर्टामध्ये जबाब पत्र दाखल केल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना फकीरा ब्रिगेडचे निवेदन.
उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फकीरा ब्रिगेडच्या वतीने दलित फिर्यादीच्या परस्पर कोर्टामध्ये जबाब पत्र दाखल केल्याबाबत आंदोलनाला सुरुवात झाली होती.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात फकीरा ब्रिगेडने निवेदनात असे नमूद केले - उमरगा तालुक्यात येळी या गावी दि . 03/10/2020 रोजी 7 महिण्याच्या गरोदर महिलेला जबर मारहाण करून तिचा गाऊन फाडुन विनयभंग व तिच्या कुटुंबाला जबर मारहाण करून त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावुन घेवुन तिच्या पतीच्या खिशातील 200-300 रुपये घेतले व जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली असुन फिर्यादी लक्ष्मी राम कांबळे आपल्या कुटुंबासह फिर्याद देण्यासाठी उमरगा पोलीस स्टेशन येथे गेले असता तेथील पोलीस कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक फिर्यादीच्या म्हणण्यानुसार फिर्याद घेण्यात टाळाटाळ केली व त्या कलमा मध्ये ती घटना आली आहे असे सांगुन उडवा उडवीची उत्तरे दिली व फिर्यादीला व फिर्यादीच्या कुटूंबाला कायद्याचे व कलमाचे ज्ञान नसल्या कारणा मुळे पोलीस अधिकारी यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर विश्वास ठेवुन फिर्यादीने त्यावर सही केली आहे. असे फकीरा ब्रिगेड यांनी या निवेदनात नमूद केले
या विषयावर फकिरा ब्रिगेड या संघटनेने चार वेळा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे परंतु अद्याप या अधिकाऱ्यावर कसल्याही प्रकारची चौकशी किंवा गुन्हे दाखल झाले नाहीत . अॅट्रॉसिटीप्रमाणे फिर्यादीकडुन तक्रार आल्यास संबंधित गुन्हेगारावर , अधिकाऱ्यावर कायद्याप्रमाणे कार्यवाही होणे अपेक्षित होते . तसेच दिनांक 04/10/2020 रोजी फिर्यादीच्या पतीचा पोलीस स्टेशन येथे जवाब घेण्यात आला असे संबंधित पोलीस स्टेशनचे म्हणणे आहे व घेतलेल्या जबाबाची प्रत कोर्टामध्ये सादर केलेली आहे . तरी फिर्यादीचे पती राम ज्ञानदेय कांबळे हे दि . 03/10/2020 पासुन ते 13/10/2020 पर्यंत स्त्री रुग्णालय उस्मानाबाद या दवाखान्यामध्ये त्याची पत्नी उपचार घेत होते . तर दिनांक 04 / 10 / 2020 रोजी पोलीस कर्मचारी यांनी कोणाचा जबाब घेतला आहे य फिर्यादीचा पती उपस्थित नसताना खोटा जवाब परस्पर घेतला आहे . तरी सदरील संबंधीत घटनेचे पुरावे तपासुन अशा कर्मचाऱ्यांना गुन्हेगाराबरोबर कर्तव्यात कसुर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे व त्यांच्यावरही अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे व कायद्याने ठरवलेल्या वेळेप्रमाणे त्या कालावधीप्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी फकीरा ब्रिगेड संघटनेकडून निवेदनात करण्यात आली आहे.
न्याय नाही मिळाल्यास या मागणीसाठी दि. 21/01/2021 पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फकिरा ब्रिगेड संघटना अमरण उपोषण करुन आत्मदहन करण्याचे ठरवले आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , गृहराज्यमंत्री , अनु.जाती जमाती आयोग, समाज कल्याण आयुक्त , उस्मानाबाद पोलीस अधीक्षक, खासदार ओमराजे निंबाळकर , पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद यांना निवेदन दिले आहे.