Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

0


Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, लोहारा: शिवराज बाबुराव जट्टे, रा. लोहारा (बु.), ता. लोहारा यांनी त्यांची होंडा सीडी डॉन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 जे 3579 ही 10 जानेवारी रोजी 19.30 वा. राहत्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. त्यांना लावल्या जागी आढळली नसल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरली आहे. अशा मजकुराच्या शिवराज जट्टे यांनी काल 19 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): प्रदिप वसंत हजारे, रा. राघुचीवाडी, ता. उस्मानाबाद हे त्यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 12 जेएच 7689 ही 17 जानेवारी रोजी 11.00 वा. गावातील आपल्या शेताजवळील रस्त्यावर लावून शेतात गेले होते. शेतातून मो.सा. लावल्या ठिकाणी आले असता मो.सा. जागेवर न आढळल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या प्रदिप हजारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top