Osmanabad येथे चोरीच्या 2 स्मार्टफोनसह आरोपी अटकेत
उस्मानाबाद : हरवलेल्या व चोरीस गेलेल्या भ्रमणध्वनीचा शोध सायबर पोलीस ठाण्यामार्फत निरंतर घेतला जातो. अशाच एका हरवलेल्या फोनच्या शोधात असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकाने 20 जानेवारी रोजी शिरुर, जि. पुणे येथील सचिन जिगनु पवार हा सध्या राहत असलेल्या उस्मानाबाद शहर बसडेपो परिसरातील सासरवाडीच्या घराची झडती घेतली. या झडतीत पोलीसांना उस्मानाबाद शहर गु.र.क्र. 366 / 2020 व 22 / 2021 मध्ये चोरीस गेलेले 2 स्मार्टफोन आढळले. यावरुन पथकाने सचिन पवार यास त्या स्मार्टफोनसह ताब्यात घेउन उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. ही कामगीरी स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोन- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, मनोज मोरे, रंजना होळकर यांच्या पथकाने पार पाडली आहे.