Osmanabad - सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

0



सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

      उस्मानाबाद,दि.20(प्रतिनिधी ):- सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उस्मानाबादच्या 50 हजार रुपयांच्या आतील आणि त्यापेक्षा अधिक ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना तसेच गुंतवणूकदारांची मुदत पूर्ण होऊनही ठेवी परत दिल्या नाहीत.अशा ठेवीदारांनी सर्व कागदपत्रासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2021 दरम्यान सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजे दरम्यान स्वत: उपस्थित राहुन आपले म्हणने सादर करावे,असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वाय.बी.खटके यांनी केले आहे.

  ठेवीदारांच्या ठेवीच्या मुदती संपल्यानंतरही त्याची रक्कम परत न केल्याने सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्हयातील आरोपी सध्या जामीनावर मुक्त आहेत.दरम्यान, या पतसंस्थेस ठेवीदारांच्या 50 हजार रुपयांच्या आतील ठेवी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top