Osmanabad - अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामुहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची-- मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस वेल्फेअर संघटनेची मागणी

0
अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामुहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची-- मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस वेल्फेअर संघटनेची मागणी 

उस्मानाबाद :- 
अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामुहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुव्हमेंट फॉर पीस अॅड जस्टीस वेल्फेअर संघटना उस्मानाबाद यांच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद शहरात दि.16 जानेवारी 2021 रोजी अल्पसंख्याक समाजाच्या मतिमंद मुलीवर परराज्यातील काही नराधमा मार्फत फक्त लैंगिक अत्याचार करण्यात आले असून पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तात्काळ दोन आरोपींना अटकही केलेली आहे. व कांही आरोपी फरार आहेत.


 सदर प्रकरणामुळे महिला व मुलीच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. सदरील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन या प्रकरणात अटक झालेल्या व फरार असलेल्या सर्व आरोपीवर पोस्को ॲक्ट अंतर्गत चार्जशीट दाखल करण्यात यावी. व हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा. पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी. या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर संघटनेचे शहराध्यक्ष एजाज बागवान, शहर सचिव असिफ रजनी, जिल्हा सचिव आसिफ शेख, यांच्यासह महिला व युवकांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top