ताणतणाव व सर्वरोग निदानबाबत कळंब येथे शिबीर यशस्वी
उस्मानाबाद,दि.20( प्रतिनिधी ):- मानसिक आरोग्य कार्यक्रम व येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रकल्प प्रेरणा कार्यक्रमाअंतर्गत कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत ताणतणाव निवारण आणि सर्वरोग निदान आरोग्य शिबीर काल यशस्वीरीत्या पार पडले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे, डॉ. शोभा वायदंडे, मनोविकार तज्ज्ञ डॉ. महेश कानडे आणि डॉ.राजेश नरवाडे, डॉ.मंजूराणी शेळके तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सारंग रामढवे, डॉ. पुरुषोत्तम पाटील , डॉ.आवटे, डॉ. भालेराव, डॉ. बिदरकर, डॉ. इम्रान शेख,डॉ. श्याम चौधरी, डॉ. विक्रांत राठोर (NTCP सल्लागार), नेत्रचिकित्सक श्री.साळुंके आदींनी रुग्णाची तपासणी करून मार्गदर्शन केले.यावेळी मनोविकार विभाग आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात मनोविकार टंडन तज्ज्ञ डॉ.राजेश नरवाडे यांनी कोविड 19 नंतर ब-याच लोकांमध्ये मानसिक आजार उदभवत असल्याचे दिसत येत आहेत. वेळीच योग्य निदान करुन औषधोपचार केल्यास, असे रुग्ण नक्कीच बरे होऊ शकतात असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात वैदयकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे यांनी अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना लाभ होईल तसेच ज्या लोकांना संशय घेणे, कानात आवाज ऐकू येणे, भास निर्माण होणे, सतत बडबड करणे, विचारांवर नियंत्रण न रहाणे, फिट्स येणे, झोप न येणे आणि व्यसनी अशा समस्यांनी ग्रस्त लोकांनी अशा शिबिरांचा आवश्य लाभ ध्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या शिबिरामध्ये 288 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी इन्चार्ज सिस्टर श्रीमती सुनंदा गोस्वामी,तानाजी कदम,पांडुरंग शिंदे, विजयकुमार यादव,दत्तप्रसाद हेडडा,ईश्वर भोसले आणि उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.