तुळजापूर तालुक्यात 2 ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल

0



तुळजापूर तालुक्यात 2 ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, तुळजापूर: मंगरुळ, ता. तुळजापूर येथील दयानंद युवराज जाधव यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 5243 ही 17- 18 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दयानंद जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, तामलवाडी: केगाव, ता. सोलापूर (उ.) येथील अतुल रमेश गायकवाड यांनी त्यांचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 13 डीएम 6884 हा सावरगांव येथील आपल्या शेतात ठेवला असता दि. 16- 17 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री तो ट्रॅक्टर अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अतुल गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top