पंरडा येथील चोरीतील 1 आरोपी 36 तासांत मुद्देमालासह अटकेत

0


पंरडा थेथी चोरीतील 1 आरोपी 36 तासांत मुद्देमालासह अटकेत

Osmanabad | परंडा: कासीमबाग परंडा येथील सुरेश सर्जेराव घाडगे हे कुटूंबीयांसह 21 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात झोपलेले असतांना 02.45 वा. सु. त्यांच्या घराच्या जिन्यावरुन चार अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश करुन सुरेश घाडगे यांसह कुटूंबीयांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील, कपाटातील 62 ग्रॅम सोन्याचे दागिने, ओपो स्मार्टफोन व 6,840 ₹ रोख रक्कम असा माल जबरदस्तीने चोरुन नेला होता. यावरुन परंडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा तपासास आहे.

            गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोहेकॉ- काझी, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, टेळे, पोकॉ- आरसेवाड, अविनाश मारलापल्ले यांच्या पथकाने गोपनीय माहिती घेउन परंडा येथील रुई रोड परिसरात राहणाऱ्या येवरड्या चितरंग्‌या पवार यास गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 36 तासांत म्हणजे आज 22 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. तपासादरम्यान गुन्ह्यात चोरीस गेलेले 62 ग्रॅम सोन्याचे दागिने व 6,840 ₹ रोख रक्कम त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली असून उर्वरीत तपासकामी त्यास परंडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात असून त्याच्या उर्वरीत साथीदारांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top