शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर
प्रतिनिधी : सांगवी (का)
तुळजापुर तालुक्यातील सांगवी ( काटी ) येथे शिवबा युवा प्रतिष्ठाण वतीने शिवजयंती निम्मित रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात छत्तीस शिवभक्तांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीराचे उदघाटन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी श्री विश्वास पवार, व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री महेश अच्युतराव पाटील यांच्या हस्ते. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून करण्यात आले. यात छत्तिस शिवभक्तांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. रक्त दात्याना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विश्र्वास पवार व महेश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. गोपाबाई दमाणी रक्तपेढीत संकलीत केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विश्वास पवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेश मगर, रामदास मगर, प्रविण मगर, विश्वास मगर, केतन मगर, दिनेश डोके, भिमा भुईरकर, महेश पाटील, विक्रम मगर ,सचिन गुंड, पैगबंर शेख, कृष्णात माळी, रघुनाथ मगर, सुमीत मगर, भालचंद्र पाटील, भागवत माने दत्ता शिंदे, ओंकार मगर, निवांत मगर, अबा स्वामी, लक्ष्मण मगर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.