चोरीच्या 3 गुन्ह्यांतील 35 ग्रॅम सुवर्ण साखळ्या व 2 स्मार्टफोनसह 1 आरोपीत अटकेत.
Osmanabad स्थानिक गुन्हे शाखा: जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा माग काढत असतांना स्था.गु.शा. च्या पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोहेकॉ- घुगे, पोना- महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, साईनाथ अशमोड, रंजना होळकर यांच्या पथकास गोपनीय खबर मिळाली की वैराग रोड, उस्मानाबाद येथील कुंभार गल्लीत राहणाऱ्या श्रीकांत सर्जेराव चव्हाण, वय 26 वर्षे हा चोरीच्या वस्तू बाळगतो. यावरुन पथकाने त्यास आज 1 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेउन विचारपुस करता त्याचा चोऱ्यांमधील सहभाग निष्पन्न झाला. पथकाने त्याच्या ताब्यातून उस्मानाबाद (श.) पो.ठा. गु.र.क्र. 31 / 2021 या लुटमारीच्या गुन्ह्यातील 10 ग्रॅम सुवर्ण साखळी व एक स्मार्टफोन आणि गु.र.क्र. 27 /2021 या चोरीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली 25 ग्रॅम सुवर्ण साखळी तसेच तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 38 / 2021 या चोरीच्या गुन्ह्यातील एक स्मार्टफोन जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस माहिती विभागाने दिली आहे.