आ.राणादादा यांची अर्थसंकल्पा बाबत प्रतिक्रिया - ( Osmanabad-Tuljapur MLA Ranajganjit Singh Patil )
पंतप्रधान मा. ना. नरेंद्रजी मोदी यांचे ‘आत्मनिर्भर भारत’ प्रत्यक्षात घडविण्यासाठी अनेक क्रांतिकारी व सर्वसमावेशक घोषणा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना वित्तमंत्री ना.श्रीमती निर्मला सितारमण यांनी केल्या आहेत. पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व अशी मोठी गुंतवणूक या सह आर्थिक विकासाला चालना देण्याकरिता रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले व शेतकऱ्यांचे हित जोपासत उत्पनात भरीव वाढीसाठी मदत, ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने मेगा इन्वेस्टमेंट टेक्सटाईल्स पार्क (MITRA) ही योजना महत्वाची ठरणार आहे. किमान आता तरी राज्य सरकारने कौडगाव MIDC येथे मेगा टेक्निकल टेक्सटाईल पार्क निर्मितीचा प्रस्ताव केंद्रातील वस्त्रनिर्मिती मंत्रालयाकडे पाठवावा ही अपेक्षा आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन अंतर्गत प्रकल्पांची संख्या ६८३५ हून ७४०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या योजनेत समाविष्ट करणे बाबत राज्य सरकारची केंद्राकडे अजूनही विनंती गेलेली नाही. रेल्वेसाठी रू. १.०७,००० कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे, परंतु सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी राज्य सरकारच्या ५०% खर्च संमतीचे पत्रही आजही प्रलंबित आहे. उस्मानाबाद सह ‘अमृत’ योजनेत असलेल्या सर्व शहरातील नागरिकांना जलजीवन मिशन (नागरी) अंतर्गत नळ कनेक्शन व सांडपाण्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून शेतमालाची आधारभूत खरेदी २०२०-२१ मध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना Agriculture Infrastructure Fund मधून मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. कृषी कायद्याबद्दल चे गैरसमज देखील या माध्यमातून दूर होत आहेत. महिला तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या नागरिकांना Stand Up India अंतर्गत कृषी आधारित उद्योगासाठी कर्ज देत असताना स्वःनिधी २५ % हून १५ % पर्यंत कमी करण्यात आला आहे.
असे मत आमदार राणाजगंजितसिंह पाटील( Osmanabad-Tuljapur MLA Ranajganjit Singh Patil ) यांनी व्यक्त केले आहे