उल्लेख आत्मनिर्भर भारत पण कृती मात्र पुंजीपतीनिर्भर भारत....! खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Shirur MP Dr. Amol Kolhe )
आज अर्थ अर्थसंकल्प सादर झाले या अर्थसंकल्प बद्दल
शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Shirur MP Dr. Amol Kolhe ) यांनी आपल्या फेसबुक पेज ( facebook page ) द्वारे आपले मत मांडले आहे .
आत्मनिर्भर भारत ही केवळ पोकळ घोषणा ठरु पाहतेय कारण आजचा केंद्रीय अर्थसंकल्प ठराविक भांडवलदारांना धार्जिणा आहे. सरकारी मिळकती विकून त्यातून पैसा कमाविणे ही अतिशय गंभीर व धोकादायक बाब आहे. रेल्वे, पोस्ट अशा महत्त्वाच्या संस्था देखील मुठभर भांडवलदारांच्या हातात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. माननीय अर्थमंत्री महोदयांनी न्यूमोकॉकल वॅक्सिनचा सातत्याने उल्लेख केला पण कोरोनावर गुणकारी ठरणारी लस भारतीयांना मोफत मिळणार का यावर त्यांनी भाष्य केले नाही. करदात्यांना कसलाही दिलासा न देणारा हा अर्थसंकल्प आहे. बकोरोनाच्या काळात करदाता सर्वसामान्य माणूस अक्षरशः कोलमडून पडला आहे. त्याला या अर्थसंकल्पात काही दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. पण तसं काही होताना दिसत नाही.आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा अर्थसंकल्प असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ व आसाम या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी तिजोरी मोकळी केली. देशाच्या अर्थमंत्री म्हणून त्यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडणे अपेक्षित होते. संपूर्ण देशासाठी आश्वासक असे काही या अर्थसंकल्पातून निघताना दिसत नाही. नाशिक आणि नागपूरच्या मेट्रोच्या समावेशाबद्दल आनंद आहे परंतु पुणे मेट्रोसाठी भरीव तरतूद अपेक्षित होती. केंद्र सरकारची तिजोरी सर्वात जास्त भरणाऱ्या मुंबईला पुन्हा या अर्थसंकल्पात काहीही मिळालं नाही हे खेदजनक आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही..एकूणच केवळ आकडेवारीची उड्डाणं असलेला अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प असून यातून देशवासीयांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांची घोर निराशा झाली आहे.
असे मत यांनी शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Shirur MP Dr. Amol Kolhe ) यांनी आपल्या फेसबुक पेज ( facebook page ) द्वारे आपले मत व्यक्त केले आहे
#Budget2021 #BudgetSession2021