Osmanabad जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील 4 आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा
पोलीस ठाणे, कळंब: जुगार खेळून महाराष्ट्र जुगार कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्या प्रकरणी एका आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी दोषी ठरवून 300 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पोलीस ठाणे, ढोकी: शिक्षण संकुलाच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करुन सिगारेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा कलम- 6 (ब) चे उल्लंघन केल्या प्रकरणी नसीर दादामिया तांबोळी यांस 200 ₹ दंडाची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी सुनावली आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: जिवीतास धोका पसरवणाऱ्या रोग प्रसाराची शक्यता निर्माण होईल अशी कृती करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन केल्या प्रकरणी एका आरोपीस 500 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कैदेची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सार्वजनिक रस्त्यावर वाहन धोकादायकपणे उभे करुन रहदारीस धोका निर्माण करण्याची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल एका आरोपीस 200 ₹ दंडाची शिक्षा मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.