Osmanabad जिल्ह्यातील 3 गुन्ह्यांतील 5 पाहिजे आरोपी अटकेत

0


Osmanabad जिल्ह्यातील 3 गुन्ह्यांतील 5 पाहिजे आरोपी अटकेत 

उस्मानाबाद जिल्हा: नळदुर्ग पोलीस ठाणे गु.र.क्र. 51 / 2020 भा.दं.सं. कलम- 395 या दरोड्याच्या गुन्ह्यातील बळेवाडी, ता. बार्शी येथील आरोपी  1)अक्षय नामदेव साळुंखे, वय 25 वर्षे 2)रत्नाकर सिध्देश्वर दळवे, वय 20 वर्षे हे दोघे पोलीसांना तपासकामी हवे होते. ते दोघे गावी परत आल्याच्या गोपनीय खबरेवरुन पोलीसांनी  31 जानेवारी रोजी बळेवाडी येथून त्यांना ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव नळदुर्ग पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

दुसऱ्या घटनेत आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 369 / 2018 भा.दं.सं. कलम- 420, 406, 418, 34 या फसवणूकीच्या गुन्ह्यातील  आरोपी- महादेव लहुजी जाधव, रा. कौडगाव, ता. उस्मानाबाद याचा पोलीस गेल्या दोन वर्षांपासून शोध घेत होते. तो गारखेडा, औरंगाबाद येथे राहत असल्याची खबर मिळाल्याने पथकाने त्यास ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहिस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.  ही कारवाई स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या नेतृत्त्वाखाली सपोनि- श्री भुजबळ, पोउपनि- श्री भुजबळ, पोहेकॉ- काझी, साळुंखे, ठाकूर, पोना- शेळके, संतोष गव्हाणे, पोकॉ- अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, सर्जे यांच्या पथकाने केली आहे.

            तिसऱ्या घटनेत उमरगा पो.ठा. गु.र.क्र. 371 / 2018 भा.दं.सं. कलम- 452, 143, 147, 323, 504, 506 या बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी- 1)सचिन मारुती बनसोडे, वय 20 वर्षे 2)तम्मा मारुती बनसोडे, वय 56 वर्षे यांचा पोलीस गेल्या दोन वर्षांपासून शोध घेत होते. ते दोघे मुळगावी गुंजोटी, ता. उमरगा येथे आल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. चे पोउपनि- श्री मालुसरे, पोकॉ- उंबरे, घुले यांच्या पथकाने त्यांना आज 1 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top