Osmanabad : जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल - osmanabad police
पोलीस ठाणे, मुरुम: बेळंब तांडा, ता. उमरगा येथील रोशनी राठोड ही 11 वर्षीय मुलगी 30 जानेवारी रोजी 16.00 वा. सु. आलुर शिवारातील शेतात जनावरे चारत असतांना तीच्या जनावरे शेजारील शेतातील तुरीच्या भुस्कटावर गेली. यावर त्या शेतमालकाने भुस्कटावर जनावरे आल्याच्या कारणावरुन रोशनी हीस काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रोशनीची आई- वैशु राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, येरमाळा: वडगाव (ज.), ता. कळंब येथील गट क्र. 350 मधील शेतात असलेल्या विद्युत खांबावरील तारांना बांधावरील झाडांच्या फांद्या लागुन स्पार्कींग होत असल्याने वडगाव (ज.) येथील अजय संजय रणदिवे यांनी ती झाडे तोडण्याचा परवाना काढून 31 जानेवारी रोजी 09.30 वा. सु. झाडे तोडण्यास बांधावर गेले. यावर शेजारील शेतकरी- 1)आण्णासाहेब बाबुराव मुंढे 2)बाबुराव लिंबा मुंढे 3)भिमराव अंबादास पाटील 4)अरविंद पोपट पाटील यां सर्वांनी अजय रणदिवे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अजय रणदिवे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: शुक्रवारी पेठ, तुळजापूर येथील 1)क्रिश नागनाथ सिरसट 2)दिपक भागवत पारधे यांसह अन्य दोन व्यक्तींनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन 30 जानेवारी रोजी 00.45 वा. सु. तुळजापूर येथील अरण्य मठाजवळ गल्लीतील- नागेश शिवाजी गायकवाड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले आणि ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नागेश गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अशी माहिती पोलीस माहिती विभागाने दिली आहे.