लोहारा पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत - पो,नि,चव्हाण

0
लोहारा पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत - पो,नि,चव्हाण

लोहारा  /  प्रतिनिधी

लोहारा शहरातील पोलीस ठाण्याच्या परिसरातील विविध घडलेल्या अपघातातील,गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहने मागील अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली आहेत, सदरील वाहने ज्याची आहेत त्यानी वाहनाची कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत असे आव्हान पोलीस निरीक्षक श्री धरमसिंह चव्हाण यांनी केले आहे, लोहारा येथील परिसरातील घडलेल्या अपघातातील बेवारस स्थितीत आढळून आलेली विविध गुन्ह्यातील जप्त केलेली अनेक वाहने धूळखात पडली आहेत, अपघातातील दुचाकी 48 ,चारचाकी 4 असे वाहने अनेक वर्षांपासून पडून आहेत,तसेच बेवारस आढळून आलेली वाहने आहेत, सदरील वाहने ज्याची आहेत त्यानी वाहनाची मूळकागदपत्रे घेऊन लोहारा पोलीस ठाण्यात घेऊन येऊन वाहनांची ओळख पटवून घेऊन जावीत असे कळविलयात आले आहे सदरील वाहने येत्या सात दिवसात घेऊन न गेल्यास वाहनाची विलेवाट लावण्यास कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी सांगितले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top