तुळजापूर :- लहुजी शक्ती सेनेचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगीत,कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आणि तहसीलदार सौदागर तांदळे यानीं मागण्या संबंधीत विभागाकडे पाठवून लवकरच सोडविल्या जातील असे दिले आश्वासन
लहुजी शक्ती सेनेचे न.प.मुख्याधिकारी आशिष लोकरे आणि त्यांचे सहकारी यांचेवर गुन्हे दाखल करावेत.ह्या इतरही मागण्या संदर्भात तुळजापू तहसील कार्यालय समोर (दि.१७)पासून धरणे आंदोलन सुरु होते.मात्र कोरोना पाश्र्वभूमीवर दि.२३ रोजी ७ वा.दिवसी तात्पुरते थांबविण्यात आले आहे. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे,प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजी गायकवाड साहेब,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ गायकवाड,अमोल सगट,सुनिल भांगे,खंडू जाधव, लक्ष्मण गायकवाड, सुरज सगट, गणेश देडे,विशाल विठ्ठल शिंदे,कुंडलीक भोवाळ,
आकाश शिंदे,किशोर साठे,शिवाजी देवकर,अमोल ढाले,दत्ता गायकवाड, बापु दत्ता लोढ,चंटू इंगोले,लक्ष्मण शितोळे,तावजी क्षिरसागर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे , तुळजापूर