हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांच्या 716 व्या उर्साच्या धार्मिक कार्यक्रमाला उद्यापासून सुरुवात - ( Hazrat Khwaja Shamshoddin Ghazi )
उस्मानाबाद : गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमानुसार उस्मानाबाद जिल्ह्याचा महत्वाचा साजरा होणारा उर्स महोत्सव यावेळी देखील गेल्यावर्षी प्रमाणे फक्त धार्मिक विधी मानकरयांच्या उपस्थितीत होणार आहे.
हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे ( Hazrat Khwaja Shamshoddin Ghazi )
यांचा 716 उर्स 25 फेब्रुवारीपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
25 फेब्रुवारी रोजी पंखा मिरवणूक , 26 फेब्रुवारी रोजी सेहरा मिरवणूक , 27 फेब्रुवारी रोजी गुसल पाणी , 28 मुख्य संदल मिरवणूक , 1 मार्च रोजी चिरागा रोशन , 2 मार्च रोजी जियारत , अशा प्रमाणे या वर्षीच्या उर्साची माहिती आहे व या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हे सर्व महोत्सव मानकरी लोकांच्या उपस्थितीत कोविड-19 च्या अनुषंगाने उपयोजन करत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी बंदोबस्त लावण्यात येणार असल्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यलयातुन प्रसार माध्यमांना देण्यात आली आहेत.