पंरडा : दरोड्याचा पर्दाफश केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांसह तपास पथकाचा सत्कार

0

पंरडा : दरोड्याचा पर्दाफश केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांसह तपास पथकाचा सत्कार

पत्रकार संघाच्या वतीने आभाराचे पत्र देवून सन्मान

उस्मानाबाद: परंडा येथील दरोड्याचा २४ तासात पर्दाफाश करीत आरोपीस अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघ व दैनिक 'पुण्य नगरी' परिवाराच्या वतीने गुरूवारी (दि.२५) आभाराचे पत्र देवून सत्कार करण्यात आला.

परंडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा वृत्तपत्र विक्रेते सुरेश घाडगे यांच्या घरी रविवारी (दि.२१) पहाटे २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकून शस्त्राचा धाक दाखवत सोने, चांदी व रोकडसह एकूण २ लाख ६६ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलीस अधीक्षक श्री. रौशन, अपर पोलीस अधीक्षक संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून २४ तासाच्या आत या दरोड्याचा पर्दाफाश करून एका आरोपीस अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त केला.त्याबद्दल जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्री.रौशन यांना आभाराचे पत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, उपनिरीक्षक पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, हवालदार वलीउल्ला काझी, पोना सय्यद हुसेन, अमोल चव्हाण, पोकॉ रविंद्र आरसेवाड, अविनाश मरलापल्ले, पोना अमोल कावरे, पोकॉ दिपक लाव्हरे पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे (भूम), सुरेश घाडगे (परंडा), गौतम चेडे (वाशी),जिल्हा संघटक मल्लिकार्जुन सोनवणे, विनोद बाकले, संतोष शेटे, तुषार चव्हाण, अमजद सय्यद, अजित माळी आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top