आर्या प्रकल्पा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथे शेळीपालन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
तुळजापूर :-
आर्या प्रकल्पा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथे दहा दिवसीय शेळी पालन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले या शिबीरात विविध भागातील पशुपालकांनी सहभाग नोंदवला होता या शिबिरामध्ये दररोज दहा दिवस नविन विषयावर तज्ञ व्यक्ती कडून मार्गदर्शन केले जाणार आहे या कार्यक्रमास सचिन सूर्यवंशी कार्यक्रम समनव्यक, व्ही. एस. जाधव विशेषज्ञ पशुविज्ञान, वर्षा मरवाळीकर विशेषज्ञ ग्रहविज्ञान, भगवान अरबाड विशेषज्ञ मृदविज्ञान,
नकुल हरवाडीकर विशेषज्ञ हवामानशास्त्र,
शिवराज रुपनर कृषि हवामान निरीक्षक हे उपस्थित होते.
बातमी संकलन : - प्रकाश साखरे