उस्मानाबाद शहरात शिवजयंती निमित्त मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य सायकल रॅली संपन्न
उस्मानाबाद - मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उस्मानाबाद शहरात शिवजयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांच्या हस्ते सायकल रॅलीला ध्वज दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सेंटर, तेरणा कॉलेज येथून वापस बार्शी नाका मार्गे आर्य समाज, पोस्ट ऑफिस, काळा मारुती चौक, माऊली चौक, विजय चौक, मदिना चौक अण्णाभाऊ साठे चौक देशपांडे स्टँड मार्गे शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला यावेळी या रॅलीत शहरातील शेकडो शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता तसेच या रॅलीत कार्याअध्यक्ष राम मुंडे सर,संघटक विशाल पाटील,उपाअध्यक्ष विशाल थोरात,सौरभ देशमुख प्रवक्ते संतोष मुळेसर,अग्निवेश शिंदे,प्रशांत पाटील, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे,रवी केसकर ,संजय पाटील,अनंत जगताप,रुद्र भुतेकर,भालचंद्र कोकाटे सर,जयंत देशमुख,गजानन खर्च,रवी शितोळे सर,चीत्रसेन राजेनिंबाळकर,रोहन पाटिल,अमोल माने,सूरज कदम,प्रदीप खामकर,संजय चव्हाण सर,डॉ.सुधीर मुळे,दर्शन कोळगे,चंद्रशेखर सूर्वसे,अमर उंबरे ,जितेंद्र खंडेराया,प्रसाद राजेनिंबाळकर,शशी पवार,खंडु राऊत,उस्मानाबाद हाफ मॅराथॉन ग्रुप आणि सर्व सायकल प्रेमी उपस्थित होते.