तुळजापूर - लहुजी शक्ती सेना,धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस

0
लहुजी शक्ती सेना,धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस

तुळजापूर :- नगर परिषद येथील मुख्याधिकारी आशिष लोकरे,स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंखे, लिपीक श्रीमती पी.पी.बरुरकर यांचेवर अनु.जाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत ह्या मागणीसाठी (दि.१७)पासून लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तुळजापूर तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून दिनांक १८ रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस होता.
      सदरील आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवित असल्याने नगर परिषद च्या संबधीत अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर अट्रोसिटी कलमान्वये गुन्हे दाखल होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन दिवसेदिवस तीव्र होणार आहे असे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरे म्हणजे आंदोलन थांबविण्यासाठी जबाबदार कोणी ही आंदोलन कर्त्या स भेटणे(चर्चेला)गेले नसल्याचे माहिती मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ गायकवाड, धर्मराज देडे,पिंटू पुदाले (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष नळदुर्ग),प्रकाश लहु कांबळे,बाळासाहेब चौधरी,सदाशिव शिंदे,किरण नंदू कांबळे,संदीप शिंदे,
श्रीकांत कांबळे,मधूकर बबनराव शेळके(जिजामाता प्रतिष्ठान उस्मानाबाद),सगट अभिमान(तालुका अध्यक्ष अ.भा.मातंग संघ तुळजापूर),जयराज क्षिरसागर, संजय भानुदास शितोळे,शरद मस्के, मेघराज सिध्दगणेश,सागर सुरेश पारडे,मुकेश देडे,अभीषक लोंढे,प्रकाश शिंदे,दत्ता पेठे,रामभाऊ रणदिवे,बालाजी मगर,सचिन कसबे,महेश कांबळे,बालाजी गायकवाड, मारुती क्षिरसागर,लहु सिरसट,सुदेश शिंदे,सुरज सगट,गुलचंद रामराव कदम,अमर गायकवाड, कुंडलीक भोवाळ आदी उपस्थित होते.

बातमी संकलन :-  रूपेश डोलारे तुळजापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top