Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल

0


Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, शिराढोन: रायगव्हाण, ता. कळंब येथील अनुरथ श्रीरंग गिराम यांनी भुखंड वाटणीच्या कारणावरुन 17 फेब्रुवारी रोजी 17.45 वा. सु. राहत्या गल्लीत पुतण्या- प्रभाकर सुधाकर गिराम यांना शिवीगाळ करुन विटाने मारहाण करुन जखमी केले आणि ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रभाकर गिराम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, आनंदनगर: शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील विशाल नाना काळे हे 16 फेब्रुवारी रोजी 22.00 वा. सु. राहत्या घरासमोर होते. यावेळी गावकरी- बापु बप्पा पवार व त्यांचे नातेवाईक- तात्या काळे, आकाश काहे, दोघे रा. उस्मानाबाद व दादा पवार, रा. सांजा या चौघांनी पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून विशाल काळे यांना शिवीगाळ करुन हंटर, काठीने मारहाण करुन जखमी केले. विशाल यांना वाचवण्यास आलेल्या त्यांची- पत्नी व मेहुन्यासही शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घराच्या पत्र्यांची मोडतोड करुन नुकसान केले. अशा मजकुराच्या विशाल काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 427, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: वडगाव (देव), ता. तुळजापूर येथील रावसाहेब ग्यानगिर गिरी यांच्या शेतबांधावरील हद्दीच्या खुना 16 फेब्रुवारी 16.30 वा. सु. शेत शेजारी भाऊबंद- लक्ष्मण बलभिम गिरी, बलभिम गिरी, शोभा गिरी तीघांनी एक्सकॅव्हेटर यंत्राच्या सहायाने खोडल्या. याचा जाब रावसाहेब गिरी यांनी त्यांना विचारला असता त्या तीघांनी रावसाहेब यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल व लाथाबुक्क्यांनी, खोऱ्या, कत्तीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रावसाहेब गिरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): उस्मानाबाद येथील 1)रोहन रायबान 2)शंभु काकडे 3)बबन काकडे 4)आयुष तोडकरी या चौघांनी 16 फेब्रुवारी रोजी 23.45 वा. सु. शहरातील मारवाडी गल्ली भागात जाउन

उजेक शकील सौदागर यांसह त्यांचे भाऊबंद- मुन्तजीर सौदागर, सिद्दीक सौदागर, मुस्तकीम पठाण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केली. तसेच सौदागर यांच्या दुल्हन साडी सेंटर या दुकानावर दगडफेक करुन व दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन कारच्या काचा फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या अजेक सौदागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरु भा.दं.सं. कलम- 324, 336, 323, 504, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top