अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी भाजपाचे धरणे आंदोलन
उस्मानाबाद/प्रतिनिधी
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर आणि आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या महाआरतीने पीक विमा आंदोलनास सुरवात करण्यात आली. खरीप हंगामात उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांच अतोनात नुकसान झालं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरुन देखील या पिकांच्या नुकसानीपोटी पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम देताना जाचक अटी लादल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अनेक अडचणी आल्या. वास्तविक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या कृषी विभागाने पाठवल्या वरून शेतकऱ्यांना मदतही दिली. हेच कृषी विभागाचे पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा भरपाई द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.15 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले कि, पीक विम्याचे 450 कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा झालेले असताना देखील कंपनीने फक्त 70 ते 80 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले, आणि बाकीचे पैसे घशात घातले, सरकारने अशा नफेखोरी कडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी आणि शेतकरी राजाला त्याच्या हक्काची विम्याची रक्कम देय करावी, बोलत असताना त्यांनी असेही सांगितले कि ही मदत, विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर नाही भेटली तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हे आंदोलन साखळी पद्धतीने 22 फेब्रुवारी पर्यंत चालवले जाणार आहे, जोपर्यंत पिक विमा कंपनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या खरीप पिकांच्या भरपाईपोटी नुकसानीची रक्कम देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ठाकरे सरकारचा निषेध करून, पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी आग्रही मागणी केली. या धरणे आंदोलनात भाजपा जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्र.का.स. सुधीर पाटील, प्र.का.स. ऍड.खंडेराव चौरे, प्र. का.स.ऍड अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस ऍड.नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे,भा.ज.यु.मो. जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेंनिंबाळकर, कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप पाटील, दत्ता सोनटक्के, किसान मोर्चाचे रामदास कोळगे, कि. मो. जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष राहुल काकडे, कळंब बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, उस्मानाबाद बाजार समितीचे सभापती दत्ता देवळकर, राजाभाऊ कोळगे, बालाजी गावडे, शंकर अंबेकर, पंचायत समिती उपसभापती आशिष नायकल, प्रशांत लोमटे, संजय जाधवर, सुशांत भूमकर, मदन बारकूल, उमेश कुलकर्णी, विकास बारकूल, विक्रम देशमुख, प्रशांत रणदिवे, मकरंद पाटील, गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, प्रवीण पाठक, सिद्धेश्वर कोरे, धनंजय वाघमारे, नामदेव नायकल, गणेश मोरे, यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी, भाजपा चे जिल्हा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.