यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये राजभाषा दिन साजरा
तुळजापूर :- यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात येथे मराठी राजभाषा दिन प्राचार्य डॉ. मोहन बाबरे प्रा. रत्नाकर उपासे उपस्थितीत साजरा करण्यात आला. साहित्यिक प्रा. रत्नाकर उपासे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम यानिमित्ताने करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये कुसुमाग्रज जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ मोहन बाबरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डी. जी. जाधव, प्रा. राजीव कदम , प्रा. रत्नाकर उपासे, अधीक्षक पांडुरंग नागणे यांची उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा राजीव कदम यांनी करताना कुसुमाग्रज यांच्या जीवनावरील प्रसंग सांगितले. यावेळी बडबदीकाठ या पुस्तकाचे लेखक साहित्यिक प्रा. रत्नाकर उपासे यांनी मंगरुळच्या एकनाथ यांच्या पात्राला समोर ठेऊन लिहीलेली कथा सांगितली. ग्रामीण ढंगातील ही कथा सांगताना मंगरूळ येथील एकनाथ यांच्या सहज आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा एकनाथ उभा केला, मोहोळ काढणारा एकनाथ सांगताना, प्रा. उपासे यांनी आपल्या शैलीत खास घटना व्यक्त केल्या. प्रा. प्रवीण भाले, डॉ. विनय चौधरी, प्रा. मंदार गायकवाड, प्रा. अमोद जोशी, प्रा. ए. डी. पाटील, प्रा. आर जे बोपालकर, डॉ. सतीश महामुनी, प्रा सी टी तांबे, प्रदीप कदम यांची यावेळी उपस्थिती होती.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे , तुळजापूर