डिजिटल मीडिया संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याचा निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
उस्मानाबाद : दि. 09 (उस्मानाबाद न्यूज) औरंगाबाद येथील विभागीय माहिती संचालक गणेश रामदासी या अधिकाऱ्यांने डिजिटल मिडियासंदर्भात चुकीचे वक्तव्य
केल्याबद्दल निषेध नोंदवत शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन उस्मानाबाद निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या ( MDMA ) वतिने देण्यात आले आहे.
यावेळी साप्ताहिक युवा मशाल या वृत्तपत्राचे ,व पोर्टलचे संपादक जफर शेख , उस्मानाबाद न्युज पोर्टल चे संपादक सलीम पठाण , मुख्य समय पोर्टल चे संपादक शहेबाज शेख, नवाब मोमीन हे उपस्थित होते.