Osmanabad जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील 1 आरोपीताला आणखी 1 दिवसांची पोलिस कोठडी

0
Osmanabad जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील 1 आरोपीताला आणखी 1 दिवसांची पोलिस कोठडी 

उस्मानाबाद शहरातील सिव्हिल रुग्णालयात कार्यरत पाच कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत ५० हजारांची खंडणी मागुन २९ हजार रुपये उकळण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला होता , या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद झाला असून , शहर ठाण्याच्या डीबी पथकाने गुरुवारी रात्री यातील एका आरोपीताला गजाआड केले आहे . याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंद " झाल्यानंतर शहर ठाण्याचे पथक सकाळीपासून ते रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध घेत होते . दरम्यान , यातील एक आरोपीत हा भीननगर येथील एका घरात लपल्याची माहिती पथकाला मिळाली . त्यानुसार पो.नि. एस.एस. बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे एएसआय गुरव , हेडकॉन्स्टेबल शिंदे , फंड , पोना बिरमवार , पो.कॉ. विलास राऊत , ज्ञानेश्वर गोरे , स्वामी आदींच्या पथकाने तातडीने कारवाई करून एका आरोपीतास अटक केली . त्याला शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती व आज 1 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने एक दिवसाच्या  कोठडीत वाढ केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top