मध्यमवर्गीय लोकांच्या व शिक्षणाच्या दृष्टीकोनातून निराश करणारा अर्थसंकल्प - डॉ.प्रतापसिंह पाटील - Dr. Pratapsinh Patil

0

मध्यमवर्गीय लोकांच्या व शिक्षणाच्या दृष्टीकोनातून निराश करणारा अर्थसंकल्प - डॉ.प्रतापसिंह पाटील - Dr.  Pratapsinh Patil

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये कोरोना नंतरच्या परिस्थितीचा विशाचार न करता प्राप्ती करांमध्ये कोणतीही घट केली नाही.त्यामुळे पाच ते दहा लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना देखील पंधरा टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. त्यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणा-या सोलापूर -तुळजापूर रेल्वेमार्गासाठी या बजेटमध्ये काही तरतूद होईल ही अपेक्षा होती मात्र ती ही अपेक्षा सरकारकडून पूर्ण झालेली नाही.त्यासोबतच कोरोना नंतर शैक्षणिक परिस्थिती बदललेली आहे या बदलत्या परिस्थितीतीवर उपाययोजना करण्यासाठी किंवा शिक्षणाच्या नविन पध्दती अवलंबण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. देशभरात शंभर सैनिकी शाळा उभा करणार असे घोषित केले असले ही संख्या देशाच्या दृष्टीकोनातून खुपच कमी आहे. असे मत -डॉ.प्रतापसिंह पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उस्मानाबाद यांनी फेसबुक पेज द्रवारे व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top