ग्रामीण भागासह शेतकऱ्यांची निराशा करणारा व महाराष्ट्रावर अन्याय करणारा असा खेदजनक अर्थसंकल्प - खासदार ओमराजे निबांळकर
( MP Omraje Nibalkar )
आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन जी यांच्याकडून सादर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची, शेतकऱ्यांची व जनतेची निराशा केली आहे. महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे असल्याचा राग केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून दाखवून दिला आहे. नाशिक व नागपुर मेट्रो वगळता राज्याला अर्थसंकल्पातुन काहीच मिळालेले नाही. LIC तसेच IDBI व आणखीन एका बँकांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा घाट आहे.
आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा अर्थसंकल्प असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ व आसाम या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी तिजोरी मोकळी केली. देशाच्या अर्थमंत्री म्हणून त्यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडणे अपेक्षित होते. देशाला दिवसा स्वप्न दाखवणारी केंद्राची भुमिका घातक ठरण्याची भिती वाटते आहे. या अर्थसंकल्पात काहीही मिळालं नाही हे खेदजनक आहे.- MP Omraje Nibalkar
पेट्रोल, डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. शेतकर्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय ठेवून 16 कलमी कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला होता, ते तर झालच नाही. पण यावेळी तर शेतकरी अर्थसंकल्पातुन गायबच झाल्याचे दुर्देवी चित्र दिसुन आले आहे. ग्रामीण भागासह शेतकऱ्यांची निराशा करणारा व महाराष्ट्रावर अन्याय करणारा असा खेदजनक अर्थसंकल्प आहे. असे मत
खासदार ओमराजे निबांळकर ( MP Omraje Nibalkar ) यांनी फेसबुक पेज वरुन दिले आहे.
#UnionBudget2021
#BudgetSession
#अर्थसंकल्प2021