Osmanabad जिल्ह्यात जुगार विरोधी 14 कारवाया

0


उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी 14 कारवाया.

पोलीस ठाणे, कळंब :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन कळंब पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी शहरात 3 वेगवेगळया ठिकाणी छापे टाकले. यात महबुब अत्तार हे होळकर चौकात कल्याण मटका जुगार साहित्य व 2220 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  जहीर शेख मदीना चौकात कल्याण मटका जुगार साहित्य व 1490 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  शब्बीर तांबोळी जुन्या दुध डेअरी परिसरात कल्याण मटका जुगार साहित्य व 1540 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले. यावरुन नमूद आरोपीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 

पोलीस ठाणे, उमरगा :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन उमरगा  पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी 4 वेगवेगळया ठिकाणी छापे टाकले. यात शेषेराव शिंदे हे बलसुर गावात  कल्याण मटका जुगार साहित्य व 780 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  शशीकांत तेलंग व नागेश चिन्नी हे उमरगा बस स्थानक परिसरात  कल्याण मटका जुगार साहित्य व 1690 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  संजय घोडके हे पतंगे रोड उमरगा परिसरात  कल्याण मटका जुगार साहित्य व 755 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले. मडवय्या स्वामी हे गुंजोटी गावात कल्याण मटका जुगार साहित्य व 1010 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले. यावरुन नमूद आरोपीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद ग्रामीण :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण  पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी येडशी येथील सरकारी दवाखान्याच्या परिसरात  छापा टाकला असता मनोज शिंदे ऊर्फ विश्वजीत हे कल्याण मटका जुगार साहित्य व 1740 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  यावरुन त्यांचे विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, भुम :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन भुम  पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी वालवड येथील सप्ताहिक बाजार  परिसरात  छापा टाकला असता शब्बीर शेख   हे कल्याण मटका जुगार साहित्य व 430 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  यावरुन त्यांचे विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन मुरुम  पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी आचलेर  गावात  छापा टाकला असता महेश सोमवंशी   हे कल्याण मटका जुगार साहित्य व 510 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  यावरुन त्यांचे विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

पोलीस ठाणे,आंबी :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन आंबी  पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी कुकडगाव  येथे  छापा टाकला असता प्रभु लांडगे   हे कल्याण मटका जुगार साहित्य व 720 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  यावरुन त्यांचे विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, शिराढोण :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन शिराढोण  पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी मंगरुळ गावातील शेतात   छापा टाकला असता 1) बबन जाधव 2) प्रभाकर चौधरी 3) तुकाराम बनसोडे 4) मधुकर निंबाळकर 5) भगवान रितापुरे   असे सर्व  तिरट जुगार खेळतांना जुगार साहित्य व 1400 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  यावरुन त्यांचे विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

पोलीस ठाणे, आनंदनगर  :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन आनंदनगर पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी लहुजी चौकात    छापा टाकला असता दत्ता तोडकरी हे कल्याण मटका जुगार साहित्य व 600 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  यावरुन त्यांचे विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, येरमाळा  :  जुगार चालु असल्याच्या गोपनिय खबरेवरुन येरमाळा  पोलीसांनी 12 फेब्रुवारी रोजी दहीफळ गावातील खंडोबा मंदीर परिसरात  छापा टाकला असता प्रशांत गायकवाड व संतोष भातलवंडे  हे कल्याण मटका जुगार साहित्य व 1190 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  यावरुन त्यांचे विरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top