उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर , उमरगा या 2 चोरी गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, तुळजापूर: तुळजापूर येथील राजेंद्र भारत पोतदार हे 09 फेब्रुवारी रोजी 19.45 वा. सु तुळजापूर येथील अग्रवाल किराणा दुकानासमोर मोटारसायकल लावून दुकानात खरेदीसाठी गेले होते. यावेळी अज्ञाताने संधी साधून त्यांच्या मोटारसायकलच्या हॅन्डलला अडकवलेली 4 कि.ग्रॅ. चांदीचे दागिने असलेली पिशवी चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजेंद्र पोतदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: कुन्हाळी, ता. उमरगा येथील शिवकन्या बिराजदार या 10 फेब्रुवारी रोजी 16.30 वा. सु. गावातील बसथांब्यावर बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने त्यांच्या पिशवीतील स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या शिवकन्या बिराजदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.